भुसावळच्या लाचखोर आगार व्यवस्थापकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

0

भुसावळ- कर्मचार्‍याचा विभागीय चौकशीचा अनुकूल अहवाल देण्यासाठी एक हजारांची लाच स्वीकारताना भुसावळ आगारातील आगार व्यवस्थापक हरीष मुरलीधर भोई, (30, पंधरा बंगला परीसर, भुसावळ) यांना सोमवार, 29 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास भुसावळ आगारातून अटक करण्यात आली होती. भोई यांना मंगळवारी न्यायालयाने 3 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती तर कोठडी संपल्याने त्यांना भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.पी.आर.क्षित्रे यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, भोई यांची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आली असून सोमवारी त्यांच्या जामिनावर कामकाज होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी व सहकारी करीत आहेत.