भुसावळच्या विवाहितेचा छळ ; पतीसह सात जणांविरोधात गुन्हा

भुसावळ : कटलरी व्यवसाय करण्यासाठी माहेरून दिड लाख रुपये न आणल्याने तसेच मुलगा न झाल्याने भुसावळातील माहेर व पुण्यातील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी नजमीन बी.शेख शाहीद (21, रा.खडका रोड, ग्रीन पार्क, भुसावळ) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी शेख शाहीद शेख शरीफ, शेख शरीफ (नाव, गाव पूर्ण माहित नाही), शरीफाबी शेख शरीफ, शेख रीजवान शेख शरीफ, तब्बोली शेख रीजवान, शेख फरहान शेख शरीफ (रा.कासेवाडी, पुणे), शेख रईस (पूर्ण नाव माहित नाही रा.रावेर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 25 एप्रिल 2019 रोजी विवाहितेचा पुण्याच्या कासेवाडी भागातील शेख शाहीद शेख शरीफ यांच्याशी विवाह झाला मात्र विवाहाच्या पाच महिन्यानंतर पती चारीत्र्यावर संशय घेत राहिला तर कुटुंबातील सदस्यांनी काही ना काही कारणावरून पती-पत्नीत वाद निर्माण केले तसेच कटलरी व्यवसायासाठी माहेरून दिड लाख रुपये आणण्याची मागणी पूर्ण न झाल्याने छळ करण्याची धमकी घराबाहेर काढून देण्यात आले. विवाहितेने सासरच्यांशी संपर्क साधल्यानंतर आम्हाला मुलगा हवा होता मात्र मुलगी झाल्याने तुला वागवणार नाही, असे सासरच्यांनी म्हटल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास प्रभारी निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जितेंद्र पगारे करीत आहेत.