भुसावळ- नाशिक येथे झालेल्या झालेल्या सायवा मिसेस महाराष्ट्र आयकॉन-2019 या राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेत भुसावळातील शीतल मुजुमदार या उपविजेत्या ठरल्या. ही स्पर्धा 6 जानेवारी रोजी श्रीसिद्धी हॉल, नाशिक येथे झाली. स्पर्धेत वेगवेगळ्या जिल्ह्यातील उत्कृष्ट महिला स्पर्धकांचा सहभाग होता. मुजुमदार यांना सायवा मिसेस उपविजेता हा किताब सेलिब्रिटी श्रृती पंडीत, गीतांजली ठोमके, मस.दामिनी महाले यांच्या हस्ते बहाल करण्यात आला, व्यासपीठावर सायवाचे महासचिव निलेश राणे तसेच जिल्हाध्यक्ष सायली पालखेडकर, दीपक पालखेडकर व प्रेरणा देसले उपस्थित होत्या.