भुसावळच्या समर समूहाचा 150 पिको उपग्रह अवकाशात यशस्वी प्रक्षेपित
डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाईट नॉन व्हेईकल मिशन 2023 अंतर्गत मिशन
भुसावळ प्रतिनिधी
येथील अंतराळ क्षेत्रातील अग्रेसर अशा नितीन जनार्धन पाटील यांच्या समर समूहाने 150 पिको उपग्रह अवकाशात यशस्वी प्रक्षेपित केला आहे.हा उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी परत वापरता येणारे हायब्रीड रॉकेट वापरले गेले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटलाईट लॉन्च व्हेईकल मिशन अंतर्गत भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे भारताचे स्वप्न पूर्तीसाठी एक पाऊल समजले जाते .
या जागतिक विक्रमाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या 2020 व 21 मधील पे लोड क्यूब चॅलेंज प्रकल्पाचा यापुढील भाग होता. या मोहिमेंतर्गत समाजातील प्रत्येक स्तरातील विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे संशोधनात्मक वृत्तीने पाहण्याची दृष्टी मिळाली आहे.संशोधनातून भावी आयुष्यात नवनवीन शास्त्रज्ञ घडून येतील असा विश्वास आहे.या प्रकल्पात विद्यार्थ्यांना उपग्रह बनवण्याचे प्रशिक्षण तसेच ते उपग्रह प्रक्षेपित करणारे व परत वापरात येणारे रॉकेट बनवण्याची संधी उपलब्ध झालेली होती.
प्रक्षेपणासाठी सर्वप्रथम वापरले हायब्रीड रॉकेट या रॉकेटचे वजन 22.5 ज्ञस होते तर उपग्रह लोड केल्यानंतर रॉकेटचे वजन 45 ते 60 किलोग्रॅम होते. सदर रॉकेट 19 फेब्रुवारी 2023 रोजी तामिळनाडू मधील कांचीपुरम जवळील पट्टीपुरम येथून अवकाशात सोडले गेले.याआधी असा प्रकल्प अमेरिकेत इलोन मस्क यांनी केला होता. जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांनी 150 उपग्रह सोबत बनवून असे रॉकेट बनविण्याचा पहिलाच प्रयोग असल्याने हा जागतिक विक्रम, आशिया विक्रम, असेच वर्ल्ड रेकॉर्ड विक्रम असा आहे.या मोहिमे अंतर्गत भारतीय विद्यार्थी व येथील समर हा ग्रुप यांनी अवकाश क्षेत्रात भारताचे नाव अभिमानाने नोंदवले आहे .
यशस्वी मोहिमेची उपयुक्तता प्रक्षेपित उपग्रहांद्वारे हवामानाचा अंदाज वातावरणीय संकल्पना व वेगवेगळ्या प्रारणांचा अभ्यास होईल, असे पेलोड वापरलेले आहेत.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटलाईट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 या अंतर्गत देशभरातून 5000 हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. यामध्ये 100 पेक्षा जास्त शासकीय विद्यालयांचा सुद्धा सहभाग होता. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रशिक्षित केले गेले. त्यानंतर प्रत्यक्ष कृती व संशोधन मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना मोहिमेतील प्रत्येक घटका विषयी प्रशिक्षित केले गेले.
याद्वारे विद्यार्थ्यांना उपग्रह तंत्रज्ञानाविषयी प्रत्यक्ष काम करण्याची बहुमूल्य संधी मिळाली. या मोहिमेअंतर्गत समाजातील प्रत्येक थरातील विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे संशोधनात्मक वृत्तीने पाहण्याची दृष्टी मिळाली.
संशोधनातून मानवी जीवन सुकर करीत असताना भावी आयुष्यात नवनवीन शास्त्रज्ञ घडून येतील असा विश्वास आहे. ही मोहीम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक अविस्मरणीय अनुभव होता.