भुसावळ – परमपूज्य माताजी श्री निर्मलादेवी प्रणीत सहजयग परिवारातर्फे शहरातील बियाणी हायस्कूलच्या प्रांगणात कोलंबियाहून आलेल्या विश्वविख्यात गायीका आनंदिता बासू यांच्याव्दारे सहज संगीताच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने सहजयोग परिवाराव्दारे भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. खास मराठी पध्दतीने पारंपारिक पोशाख घालून सर्व बंधू-भगिनींनी ही मिरवणूक काढली होती.त्यामध्ये लहान मुलांनी विविध देवी देवता यांचा पोशाख केला होता. लेझीम, तालवाद्य त्याच बरोबर ढोल पथक यांचा मिरवणूकीतील सहभाग हा विशेष लक्ष वेधून घेत होता.
सहज संगीत आणि ध्यानाचा संबंध उलगडला
संध्याकाळच्या सुंदर अश्या वातावरणामध्ये आनंदिता बासु यांची भक्तीमय प्रस्तुती साधकांना चैतन्यमय करीत होती. गेल्या 10 वर्षामध्ये 45 देशांमध्ये सहज संगीताच्या मैफिलीचे सादरीकरण आनंदिता बासु यांनी केले आहेत. सर्व प्रथम श्री गणरायाला वंदन,श्रीकृष्णांना वंदन यावरती भक्ती रचनांची प्रस्तुती झाली. ’ब्रम्ह शोधिले ब्रम्हांड मिळाले’ या भक्ती गीताने रसिक मंत्रमुग्ध झालेत. परमपूज्य माताजी श्री निर्मलादेवी यांनी 1970 साली सहजयग ध्यान पध्दतीची सुरूवात केली. आज विश्वातील 160 हून ाधिक देशांमध्ये हि ध्यान पध्दती विनामूल्य पध्दतीने सामुहिक ध्यानाव्दारे साधकांना शिकवली जाते. सहज संगीत आणि ध्यानाचा संबंध हा आनंदिता बासू यांनी विशद केला.त्याच बरोबर उपस्थित असलेल्या हजारोंच्या संख्येने आलेल्या साधकांना त्यांनी आत्मसाक्षात्काराची अनुभूती प्रदान केली. त्यानंतर सूफी संगीताचे सादरीकरण झाले.’ओ लाल मेरी’ या सूफी संगीतावरती संपूर्ण प्रांगण आनंदामध्ये डूंबून गेले. भुसावळमध्ये पहिल्यांदाच अश्या प्रकारचा हा कार्यक्रम झाला होता.
यांची प्रमुख उपस्थिती
आमदार संजयजी सावकारे, नगरसेवक मनोज बियाणी सपत्नीक उपस्थित होते. सहजयग परीवाराच्या वतीने प्रा.प्रशांत रेवागड, उमेश नेरकर, चेतन पाटील, महेश कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी सहभागी असणार्या कलाकारांमध्ये आनंदिता बासु (साउथ अमेरिका), त्यांचे पती श्री अन्द्रेस, तबला वादक संदीप दलाल (अमरावती), हार्मोनियम वादक मिलिंद लाल (पुणे) आणि ढोलकी वादक शुभम अनेरिया (देवास,म.प्र.),यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन सहजयोग परिवाराच्या वतीने स्वप्नील धायडे यांनी केले.