भुसावळमध्ये रचला ललवाणी परीवाराने धार्मिक इतिहास

0

नलिन, ज्योती, शोभा, प्रा.डॉ.दिलीप ललवाणी यांची तपसाधना

भुसावळ- श्री श्रावक संघाचे माजी कोषाध्यक्ष व जेष्ठ सुश्रावक मदनलाल ललवाणी यांच्या परहवारातील सदस्यांनी सुरु असलेल्या प.पु.महाराष्ट्र प्रवर्तीनी, तत्वचिंतीका डॉ.ज्ञानप्रभाजी म.सा. आदि ठाणा 9 यांच्या चातुर्मासात धार्मिक क्षेत्रात मानाचा बिंदु प्रस्थापीत करुन एक अलौकिक इतिहासाचा पाया घातला आहे. वास्तवीक शहरात ललवाणी हे एकच कुटुंब असुन या कुटुंबाची कायम धार्मिक क्षेत्रात आघाडी राहिलेली आहे. स्वत: मदनलाल ललवाणी यांनी आपला 75 वा वाढदिवस स्थानकातच 75 सामाईक साधना (सलग 65 तास) बसुन आगळ्या-वेगळ्या रीतीने साजरा केला. त्यांचेच कनिष्ठ पुत्र नलीनकुमार ललवाणी यांच्या आज 33 उपवासाची पचकावणी (शपथवीधी) झाली. त्यांनी गेल्यावर्षी सुध्दा चातुर्मासात 35 उपवास केले होते. लागोपाठ दोन मासखमण (30वा जास्त उपवास) करणारे ते भुसावळ जैन समाजातील पुरुष वर्गात पहिले ठरले असुन हा धार्मिक विक्रमावर त्यांनी आपले नाव नोंदले आहे. जैन उपवासात सुर्योदयानंतर व सुर्यास्तापुर्वी फक्त गरम पाणीच प्राशन करु शकतात. बाकी सर्व अन्न वा पेय व्रज्य असते. ज्योती नलीन ललवाणी यांचे ही 60 आयंबील आहेत. आयंबील या तपामध्ये तेल, तुप, दुध व दुग्धजन्य पदार्थ, मिरची, मसाले सर्व व्रज्य असुन दिवसातुन फक्त एकाच वेळी, एकाच बैठकीत साधे जेवण व गरम पाणी सेवन केल जाते. कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.दिलीपकुमार ललवाणी यांच्या 15 उपवासाची पचकावणी मंगळवारी होणार आहे. शोभा दिलीप ललवाणी यांचे 51 एकासन आहे. एकासन या तपात दिवसातुन एकदाच एकाच बैठकीत जेवण करतात. या दोहोंची तपआराधना चालु आहे. विशेष बाब म्हणजे फक्त दोन वर्षाचा चिमुरडा नातु आरव हा ही चोवीयार (सुर्योदयानंतर व सुर्यास्तापुर्वीच खाण व पिण नंतर सर्व व्रर्ज्य करीत आहे. मदनलाल ललवाणी यांची आई, पत्नी, दोन्ही मुल, दोन्ही मुली, सुन या सर्वांचे मासखमण झाले आहे. भुसावळ येथील जैन समाजातील एकाच कुटुंबात इतकी तपआराधना ही धार्मिक क्षेत्रातील ऐतीहासीक बाब आहे. या सर्वांच्या तपआराधनेबाबत श्री श्रावक संघ, पदाधिकारी, तेरापंथ समाज संघ, सुशिल बहु मंडळ, तेरापंथ महिला मंडळ, संगीत मंडळ, जैन सोशल ग्रृप, भगवान महावीर नवयुवक ग्रृप, दिगंबर जैन संघ, कळमसरा श्री श्रावक संघ, समस्त ललवाणी परिवार, मित्र परिवार, अंकल पार्सल ग्रृप, आनंद भजन मंडळ, युवा फोरम, संगिनी फोरम, पांडव ग्रृप आदींनी अनुमोदन व स्वागत केले आहे.