भुसावळला बोगस मतदान

0

भुसावळ । पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसंदर्भात शुक्रवार 3 रोजी भुसावळ विभागातील तीन केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यांमध्ये भुसावळ शहरातील बोगस मतदान तालुक्यात तीन मतदान के्ंरदावर 2 हजार 396 मतदारांपैकी 2 हजार 396 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने 62.18 टक्के मतदान झाले. यामध्ये द.शि. विद्यालयातील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली. यासंदर्भात मात्र तहसिलदार मिनाक्षी राठोड यांनी मात्र आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करुन या केंद्राची जबाबदारी संबंधित अधिकार्‍यांवर होती.

याबाबत त्यांच्याकडून माझ्याकडे अहवाल प्राप्त झालेला नसल्याचे सांगितले. संबंधित व्यक्तीच्या नावावर मतदान झाल्याचे उघडकीस आल्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकार्‍यांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत असून येथील अधिकार्‍यांनी ओळखपत्राची पाहणी न करताच मतदारांना आत सोडले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे बोगस मतदानासंदर्भात प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष लागून आहे.

तिन्ही केंद्रांवरील मतदानाची आकडेवारी
डि.एस. हायस्कूल मधील मतदान केंद्रावर 1 हजार 735 तर वरणगाव येथील मतदान केंद्रावर 661 मतदार होते. यामध्ये मतदान केंद्र 64 वरणगाव येथे 661 मतदारांपैकी 113 स्त्रीया व 315 पुरुष अशा एकूण 428 (64.75) टक्के मतदान झाले. केंद्र क्रमांक 65 द.शि. विद्यालयात 882 पैकी 186 स्त्री व 371 असे 557 (63.15) टक्के, केंद्र क्रमांक 66 मध्ये 853 पैकी 152 स्त्रीया तर 353 पुरुष असे 505 जणांनी (59.20) टक्के मतदान केले.

केंद्राध्यक्षांकडून उडवाउडवीची उत्तरे
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसंदर्भात तालुक्यात भुसावळ शहरातील द.शि. विद्यालयात दोन तर वरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत एक मतदान केंद्र होते. नाशिक पदवीधर मतदार संघातील यादी भाग क्रमांक 126 अनुक्रमांक 5 मधील मतदार आशिष कैलास अग्रवाल हे द.शि. विद्यालयातील केंद्रावर मतदान करण्यास गेले असता अग्रवाल यांच्या नावे कुणी दुसर्‍याच व्यक्तीने मतदान केल्याचे आढळून आले. याबाबत मतदान केंद्राध्यक्षांना लागलीच विचारणा केली असता त्यांनी अग्रवाल यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. परंतु काही वेळानंतर त्यांनी सावरासारव करत अग्रवाल यांना पुन्हा बोलावून त्यांच्याच नावे अधिकचे मतदान करावयाचे लावले. यातून केंद्रावरील अधिकार्‍यांनी या बोगस मतदानाची जबाबदारी घेण्याचे टाळले असल्याचे दिसून येते. मात्र आशिष अग्रवाल यांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना निवेदन दिले असून या प्रकराची सखोल चौकशी करुन बोगस मतदान करणार्‍या व्यक्तीचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

62 टक्के मतदानाची नोंद
डि.एस. हायस्कूलमध्ये 2 तर वरणगाव येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत एक अशी तीन मतदान ेकेंद्र होती. शुक्रवार 3 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडली. याची एकूण सरासरी लक्षात घेता 2 हजार 396 पैकी 1 हजार 490 म्हणजेच 62.18 टक्के मतदान झाले. सकाळी 6 वाजेपासून या केंद्रावर बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसिलदार मिनाक्षी राठोड या मतदान के्ंरदांच्या प्रमुख होत्या. पोलीस निरीक्षक एकनाथ पाडले यांनी देखील सुरक्षेची पाहणी केली.