एकनाथराव खडसे ; भुसावळात जि.प.सदस्याच्या तक्रारीनंतर धान्याची मोजणी केल्यानंतर निघाले क्विंटलमागे दहा किलो कमी धान्य
भुसावळ :भुसावळसह चाळीसगाव व अमळनेर तालुक्यातील कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला असून आपल्या मुक्ताईनगरातही 600 क्विंटल धान्याचा अपहार झाल्याची माहिती माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे दिली.
भुसावळातील शासकीय गोदामात क्विंटलमागे 10 ते 12 किलो धान्य कमी दिले जात असल्याची तक्रार जिल्हा परीषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी केल्यानंतर खडसे यांनी गोडावूनला भेट दिली जात असता भ्रष्टाचार उघड झाला. खडसे म्हणाले की, प्रांताधिकारी, तहसीलदार, गोडावून कीपर व जळगाव पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांना निलंबित केल्याशिवाय व जेलमध्ये टाकल्याशिवाय आपण आता स्वस्त बसणार नाही. राज्याचे मुख्य सचिव, सचिव तसेच जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्याकडे त्यांनी या प्रकाराबाबत तक्रार केली तसेच गोडावून सील करून धान्याची मोजणी करावी, असे त्यांनी सांगितले. विधानसभेत हा प्रश्न आपण लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.