भुसावळसह केर्‍हाळ्यात आत्महत्येने हळहळ

0

भुसावळ / रावेर- शहरातील लक्ष्मी नारायण नगरातील 53 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. 26 रोजी दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली. कल्पना महेंद्र शेजवळकर (53) असे मयत विवाहितेचे नाव आहे. चंद्रकांत तायडे यांनी बाजारपेठ पोलिसात खबर दिली.
केर्‍हाळ्याच्या इसमाची आत्महत्या ः रावेर- तालुक्यातील केर्‍हाळा येथील रहिवासी रामदास लहूजी पाटील (55) यांनी शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास त्यांच्या दाभोळा वस्ती मंगळूर शिवारातील शेतात विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. माजी सरपंच अनिल पाटील यांच्या खबरीवरुन रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास संदीप खंडाळे करीत आहे.