भुसावळसह चाळीसगाव व मुक्ताईनगरातील गोदामपालांचे होणार निलंबन

0

धान्यातील ‘मापातील पाप’ भोवणार ; दोन दिवसात निघणार आदेश

भुसावळ– धान्यातील मापातील पाप भुसावळसह चाळीसगाव व मुक्ताईनगरच्या गोदाम पालांना भोवणार आहे. पुरवठा शाखेने तीनही ठिकाणच्या गोदाम पालांना निलंबित करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार केले असून दोन दिवसात जिल्हाधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने त्यांचे निलंबन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांनी दिली. भुसावळच्या जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी ‘मापातील पाप’ उघड केल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्याकडे तक्रार केली होती. खडसे यांनी अन्न व पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे तक्रार केल्यानंतर जिल्हाभरात मुंबईच्या दक्षता समितीने गोदामांची तपासणी केली होती. त्यानंतर भुसावळात 158 पोते गहू तर 91 पोते तांदूळ कमी भरले होते. मुक्ताईनगरात अनियमितता तसेच चाळीसगावात 22 पोते गहू कमी तर 39 पोते तांदूळ जास्त आढळून आला होता.