भुसावळ- दुर्गोत्सवाच्या विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभुमीवर शहरातील 15 तर नशिराबाद येथील सहा, तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दितील दोन अश्या 23 जणांना 16 ते 20 ऑक्टोबरदरम्यान शहरबंदी करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर यांनी काढले आहेत. हे आदेश संबंधितांना तत्काळ बजाविण्याच्या सूचना डीवायएसपी गजानन राठोड यांनी दिल्यात. शुक्रवारी दुर्गा विसर्जन होणार असून त्यापार्श्वभुमीवर प्रांताधिकारी यांनी गावबंदीचे आदेश काढले आहे. संबंधित पोलिस ठाण्यात आदेश देण्यात आले असून संबंधितांना ते आदेश बजाविण्याच्या सूचना केल्या आहे. त्यामुळे शहर, बाजारपेठ, नशिराबाद व तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी बुधवारी सकाळपासून संबंधितांना आदेश बजावण्याची कामगिरी करीत आहेत.