भुसावळसह बोदवड येथील दोन अट्टल गुन्हेगारांना हद्दपारी

0

भुसावळ। भुसावळसह बोदवड येथील दोन अट्टल गुन्हेगारांना हद्दपार करण्यासंदर्भात आलेल्या प्रस्तावावरुन उपविभागीय अधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी बुधवार 19 रोजी या प्रस्तांवांना मंजुरी देत या गुन्हेगारांना दोन वर्षासाठी हद्दपार केल्याचे आदेश दिले आहेत.

यामध्ये भुसावळ शहरातील गुन्हेगारासंदर्भात रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या हद्दपारीच्या प्रस्तावानुसार खडका रोड परिसरातील रहिवासी गोलू उर्फ शाकीर रशीद सैय्यद याला दोन वर्षासाठी जळगाव आणि धुळे जिल्हा बंदी करुन हद्दपारीचे आदेश जारी केले. तर मुक्ताईनगर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या प्रस्तावावरुन बोदवड येथील रहिवासी व अट्टल गुन्हेगार शाकीर उर्फ गण्या हाशम बागवान यास जळगाव व बुलढाणा असे दोन जिल्हे हद्दपार करण्यात आल्याचे आदेश जारी केले.