भुसावळसह रावेरात तलाठी संघटनेतर्फे निदर्शने
अपमानास्पद बोलणार्या पुणे जमाबंदी आयुक्तांची बदलीची मागणी
रावेर : महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष डुबल (आप्पा) यांनी राज्यातील नैसर्गिक आपत्ती व ई पीक पाहणीसंदर्भात पाठवलेल्या व्हॉटस्अॅप संदेशाला पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी ‘मुर्खासारखे संदेश पाठवू नका‘, असे म्हटल्याने पर्यायाने राज्यातील सर्व तलाठी, मंडळाधिकारी व तलाठी संवर्गातील अव्वल कारकून यांचा अपमान झाल्याने जगताप यांच्या कार्यपद्धत्तीचा निषेध करीत त्यांची बदली करावी, अशी मागणी रावेर तलाठी संघटनेने करीत रावेर तहसीलबाहेर निदर्शने केली.
रावेरातील आंदोलनात यांचा सहभाग
आंदोलनाला कोतवाल व महसूल संघटनेने सुध्दा पाठिंबा दिला. या आंदोलनात मंडळ अधिकारी विठोबा पाटील, सचिन पाटील, कौशल चौधरी, प्रवीण पाटील, अध्यक्ष हनीफ तडवी, गुणवंत बारेला, अनंत खवले, मीना तडवी, सी.जी.पवार, जनार्दन बंगाळे, राजेंद्र शेलकर, शरद पाटील, गोपाल मगन, समीर तडवी, यासीन तडवी, प्रवीण वानखेडे आदी आंदोलनात सहभागी झाले.
भुसावळ शहरात तलाठी बांधवांची निदर्शने
भुसावळ : भुसावळ तालुका तलाठी संघातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी भुसावळ त्हसीलदार दीपक धीवरे यांना पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांची तातडीने बदली करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले. अर्वाच्य भाषेत संबोधन करणार्या जगताप यांना पायउतार करावे, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र फेरफार प्रकल्प राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष दुबल आप्पा यांना मुर्ख असे संबोधन केल्याने राज्य तलाठी संघाच्या सदस्यांचे मन दुखावले आहे. यावर निर्णय न झाल्यास तहसीलदार यांच्याकडे डी.एस.सी.जमा करून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. नैसर्गिक आपत्ती कामे व निवडणुकीची कामे वगळता बुधवार पासून सर्व कामे बंद करण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यांचा आंदोलनात सहभाग
भुसावळ तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष व्ही.आर.बारी, उपाध्यक्ष के.आर.ठाकूर, सचिव पवन नवगाळे, जिल्हा संघटक एस.एम.इंगळे, कार्याध्यक्ष के.डी.गोरोले, सहचिटणीस डी.एम.पवार, खजिनदार अंजुषा जाधव, सल्लागर एस.जे.इंगळे, एस.व्ही.कुंभार, बाळासाहेब गायकवाड, मनीषा गायकवाड, हिना शेख, साधना खुळे, वाघमारे, माधुरी सोनवणे, वैशाली पाटील, जयश्री पाटील व तलाठी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.