भुसावळातही ‘पद्मावत’ला विरोध

0

राजपूत समाजाने दिले चित्रपटगृह चालकांना निवेदन

भुसावळ– संजय लिला भन्साळी दिग्दर्शित पद्मावत चित्रपटात इतिहासाचे विकृत दर्शन घडवण्यात आले असून क्षत्रिय समाजाने जळगावात मोर्चा काढून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी 19 रोजी मोर्चाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली होती. जळगावातील सिनेमा चित्रपटगृह चालकांनी हा सिनेमा चालवणार नसल्याची भूमिका घेतल्याने भुसावळात याचे प्रदर्शन करू नये, अशी मागणी शहरातील राजपूत समाजबांधवांनी पांडुरंग टॉकीजच्या मालकांना सोमवारी निवेदनाद्वारे केली.

यांची होती उपस्थिती
शहरातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्याम गोविंदा, समाधान महाजन, दामोदर राजपूत, सतीश मेहेरे, नकूल राजपूत, सोनी ठाकूर,दलजीत राजपूत, राजेंद्र पाटील, नितीन पाटील, सुरेंद्रसिंग पाटील, जय चौधरी, महेश महाजन, शरद जोहरे, राजेंदसिंग पाटील, दिलीप पाटील, सुनिल पाटील, रामसिंग पाटील, हेमराज महाजन, प्रमोद ठाकूर, प्रविनसिंग बोदर, कोमल सिंग मेहेरे, सुभाष महाजन, मुरली महाजन, धनसिंग महाजन गोलू मेहेरे, बबलू मेहेरे, किशोर शिंदे, हर्षल पाटील, अमोल पाटील यांच्यासह राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.