भुसावळ- शहरातील नसरवंजी फाईल भागातील अकोला धर्मशाळेजवळ सुभाष झिपरु गोमटे (50, रा.बरहानपुर, ह.मु.गवळीवाडा, भुसावळ) कल्याण मटका-सट्ट्यावर पैसे घेत असताना बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकून त्यास गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अटक केली. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 300 रुपयांची रोकड व जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिस ठाण्याचे एएसआय अंबादास पाथरवट, नाईक सुनील थोरात, दीपक जाधव, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर आदींच्या पथकाने केली. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास नाईक दीपक जाधव करीत आहेत.