भुसावळातील अतिक्रमणग्रस्तांसाठी पालिकेची उद्या विशेष सभा

0

भुसावळ- रेल्वे हद्दीतील अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर विस्थापीत झालेल्या कुटुंबियांचे पुर्नवसन करण्यासंदर्भात पालिकेची बुधवार, 28 रोजी सकाळी 11 वाजता विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. शहरातील ज्या भागातील अतिक्रमण हटवण्यात आले त्याबाबतची माहिती जिल्हाधिकार्‍यांना कळवणे तसेच उपाययोजना करण्यासंदर्भातील मार्गदर्शन त्यांच्याकडून जाणे घेणे या विषयासह विस्थापीत झालेल्या परीवारांसाठी शासनाकडून जागेची मागणी करणे तसेच सोयी-सुविधा पुरवण्यासाठी निधीची मागणी करणे शिवाय जनविकास कार्यक्रमांतर्गत नवीन प्रस्ताव तयार करण्याबाबत सभेत चर्चा केली जाणार आहे. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे असतील.