भुसावळातील अमरनाथ नगरात चार ठिकाणी घरफोड्या

0

तीन ठिकाणी घरमालक बाहेर गेल्याची चोरट्यांनी साधली संधी

भुसावळ- शहरातील अमरनाथनगरातील चार बंद घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना गुरूवारी पहाटे उघडकीस आली. एका घरात सुदैवान ऐवज नसल्याने चोरट्यांनी रीकाम्या हाती परतावे लागले मात्र अन्य घरातून मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती आहे. कुटुंब बाहेर गावाहून परतल्यानंतर नेमका काय ऐवज चोरीला गेला? याची माहिती कळू शकणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

चार बंद घरांना चोरट्यांचे टार्गेट
शहरातील जामनेर रोडवरील अमरनाथ नगरातील रहिवासी बाळकृष्ण कैलासचंद ठाकूर यांचे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजाचे लोखंडी ग्रीलची कडी तोडून आत प्रवेश केला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त फेकण्यात आला मात्र घरातील कुठलाही किंमती सामान नसल्याने चोरट्यांनी रीकाम्या हाताने परतावे लागले. चोरट्यांनी ठाकूर यांच्यासह त्यांच्या घराच्या शेजारील सुभाष सुरवाडे, विनोद जोशी आणि काशिनाथ गायकवाड यांच्या घरात घरफोडी केली मात्र तिघे कुटुंबिय बाहेरगावी गेलेले असल्याने त्यांच्या घरातून कितीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला, याची माहिती मिळू शकली नाही.