भुसावळातील अल्पवयीन तरुणीस फूस लावून पळवले

0

भुसावळ- शहरातील समता नगरातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीस द्वारका नगर भागातून अनोळखी आरोपीने फुस लावून पळवून नेल्याची घटना 18 रोजी सकाळी सात वाजता घडली. अल्पवयीन तरुणी ट्यूशन क्लाससाठी घरातून बाहेर पडली होती. दहा वाजेच्या सुमारास तरुणी घरी न परतल्याने तिचा शोध घेतला असता तरी ट्यूशनला न आल्याचे कळाल्यानंतर पोलिसात धाव घेण्यात आली. अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने काळ्या रंगाचा कुर्ता, लॅगीज तसेच स्वेटर घातले आहे.