भुसावळ- शहरातील अल्पवयीन तरुणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याप्रकरणी संशयीत आरोपी शाहरुख उर्फ रघु (पूर्ण नाव, गाव माहित नाही) याच्याविरुद्ध सोमवार, 10 रोजी रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शाहरूख शेख उर्फ रघु शाहाबुद्दीन (22, रा.गांधी कॉलनी, लालबाग, बर्हाणपूर, मध्यप्रदेश) यास अटक करण्यात आली आहे.
लग्नाच्या आमिषाने केला अत्याचार
घरात आई रागावल्यानंतर 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीने घर सोडल्यानंतर तिला शाहरूख शेख उर्फ रघु शाहाबुद्दिन (वय 22, रा. गांधी कॉलनी, लालबाग, बर्हाणपूर, मध्य प्रदेश) यों या मुलीस लग्नाचे आमिष देत औरंगाबाद येथे नेत घटना 4 ते 6 फेब्रुवारी दरम्यान अत्याचार केला. इकडे मुलगी घरी न आल्याने तिचा शोध सुरू असताना मंगळवार, 4 रोजी मुलीच्या आईस मुलीने आपण औरंगाबादमध्ये मैत्रीणीच्या घरी आल्याचे कळवल्यानंतर गुरुवारी मुलीच्या आलेल्या मोबाईल नंबरवर फोन करून मुलीस आई-वडील यांनी समजूत काढल्यानंतर मुलगी गुरूवारी सायंकाळी घरी परत आली. मुलगी घरी आल्यानंतर तिने झालेल्या अत्याचाराची माहिती दिल्यानंतर बाजारपेठ पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली.
आरोपीकडून कुटुंबाला धमकी
मुलीस पळवून नेणार्या शाहरूख याने मुलीचे काका व आई यांना मोबाईलवर फोन करून धमकी देत मुलीस माझ्या ताब्यात न दिल्यास तुमच्यावर हल्ला करून कुटुंबातील सदस्या ठार मारण्याची धमकी दिल्याने सदस्य घाबरले. दरम्यान, आरोपी शाहरूख हा बंटी पथरोड याच्याकडे काम करतो, असे फिर्यादीत मुलीच्या आईने नमूद केले आहे. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड व पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार तस्लीम पठाण, ईश्वर भालेराव, विकास सातदिवे, किशोर महाजन, रमण सुरळकर, रवींद्र तायडे अयाज सय्यद यांनी सापळा रचून टिंबर मार्केट परिसरात आलेल्या शाहरूख शेखच्या मुसक्या आवळल्या.