16 वर्षीय शाळकरी अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

Molestation In Minor Girl in A Bhusawal : A Crime Against A Youth भुसावळ : शहरातील 16 वर्षीय शाळकरी अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना गुरुवार, 15 रोजी सायंकाळी सहा वाजता डी.एल.हिंदी विद्यालयाच्या परीसरात घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी कृष्णा मोहन परदेशी (19, गांधी नगर, भुसावळ) याच्याविरोधात विनयभंग व पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पाठलाग करीत मारहाण व केला विनयभंग
पीडीतेच्या तक्रारीनुसार, आरोपी कृष्णा परदेशी याने पीडीतेचा पाठलाग करीत तिला मारहाण करीत अश्लील शिविगाळ करून तिचा विनयभंग केला. तपास बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.