भुसावळातील अवैध वाहतूकदांवर कायद्याची कुर्‍हाड

0

सिंघम रस्त्यावर ; 20 वाहने जप्त ; न्यायालयात होणार दंड

भुसावळ- शहरातील अवैध वाहतूकदारांना वठणीवर आणण्यासाठी सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल शुक्रवारी स्वतः रस्त्यावर उतरताच अवैध वाहतूकदारांच्या तंबुत घबराट पसरली. बसस्थानका भागात एकाचवेळी पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत अवैधरीत्या प्रवाशांची वाहतूक करणार्‍या रीक्षा, जीप, ओमनी आदी 20 वाहनांना ताब्यात घेण्यात आले तर बसस्थानक भागातून वाहतूक नियमांचे उल्लंघण करणार्‍या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आल्याने वाहनधारकांमध्ये खळबळ उडाली. पोलिसांना पाहताच अनेकांनी मार्गदेखील बदलला. जमा केलेली वाहने बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आली असून त्यांच्यावर 283 प्रमाणे खटले भरून न्यायालयात संबंधिताना दंड सुनावण्यात येणार आहे.

सिंघमांच्या कारवाईचे उत्स्फूर्त स्वागत
भुसावळात अनेक अधिकारी आले अन गेलेही मात्र सहाय्यक अधीक्षक नीलोत्पल यांनी जाता-जात अवैध वाहतूकदारांवर जोरदार कारवाई केल्याने सुज्ञ शहरवासीयांनी कारवाईचे उत्स्फूर्त स्वागत केले तर कारवाई एका दिवसाऐवजी नियमित करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.