भुसावळ : रेशन दुकानदाराकडून दरमहा 500 रुपयांच्या हप्त्यांप्रमणे तीन महिन्यांची एकूण एक हजार 500 रुपये लाच मागणार्या भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा अव्वल कारकून रवींद्र विनायक तारकस (57, हकीमी कॉम्लेक्स, जाम मोहल्ला, शालिमार हॉटेलजवळ, भुसावळ) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयातून रंगेहाथ अटक केली. या कारवाईने तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात अधिकारी व कर्मचार्यांनी केली.