भुसावळातील आकाश इंगळे दोन वर्षासाठी हद्दपार

भुसावळ प्रतिनिधी दि 7

शहरातील पंचशील नगर भागातील आकाश उर्फ चॅम्पियन श्याम इंगळे, वय 21 राहणार यास चौकशी अंती उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ जितेंद्र पाटील यांनी दोन वर्षांसाठी जळगांव जिल्ह्यातून हद्दपार केलेले आहे. त्याच्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आयपीसी 457, 380,461,34,454 या कलमांतर्गत विविध गुन्हे दाखल आहेत. सर्व गुन्हे हे घरफोडी तिजोरी फोडणे, चोर करणे, लुटमार करणे, जिवे मारण्याची धमकी देऊन चोरी करणे याबाबत आहेत. सबब मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 56 मधील तरतुदीनुसार हद्दपार करण्यात आलेले आहे.

 

त्याचप्रमाणे भुसावळ शहरातील गणेशोत्सव दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यापासून परावृत्त करण्याकरिता बाजारपेठ पोलीस स्टेशन, तालुका पोलीस स्टेशन तसेच शहर पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉडवरील सराईत एकूण ४४ गुन्हेगारांना अकरा दिवसांसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. तर पोलीस उपविभागातील नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील दहा रेकॉडवरील सराईत गुन्हेगार स्थानबद्ध करण्यात आले आहे