भुसावळ : शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या आरपीडी रस्त्याची विदारक अवस्था झाली होती. स्थानिक पालिका प्रशासन व रेल्वे प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही रस्त्याचे काम होत नसल्याने रेल्वे कर्मचारी तसेच या परीसरात राहणार्या नागरीकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. रेल कामगार सेना व एनआरएमयु, एस.सी.एस.टी.असोशिएशन, ओबीसी असोसिएशन आदी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे या रस्त्याचे काम करण्याबाबत आग्रह धरला होता व रेल्वे प्रशासनाने मागणीची दखल घेत आरपीडी रस्त्याच्या कामाला सुरूवात केली आहे. अत्यंत दुरवस्था झालेल्या भागाचे नव्याने डांबरीकरण केले जात असून जिथे लहान खड्डे आहेत ते डांबराने बुजवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
मागणीची दखल : नागरीकांनी व्यक्त केले समाधान
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने या रस्त्याने ये-जा करणार्या नागरीकांसह वाहनधारकांची संख्या कमी झाल्याने रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे कोर्ट ते लिम्पस क्लब, एमओएच, पीओएच पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. रस्ता कामासंदर्भात् रेल कामगार सेनेने वारंवार रेल्वे डीआरएम, जी.एम., स्थानिक नगरपालिका प्रशासन तसेच पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. रेल्वे प्रशासन व नगरपालिका एकमेकांकडे बोट दाखवून वेळ मारून नेत होते मात्र त्याचा फटका रेल्वे कर्मचार्यांना सोसावा लागत होहता. अखेर रेल्वे प्रशासनाने मागणीची दखल घेत ज्या ठिकाणी रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे तेथे नव्याने रोड बनवण्यास सुरुवात केली असून ज्या ठिकाणी केवळ खड्डे आहेत ते बुजवण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, संपूर्णपणे रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रस्ता कामासाठी यांचा पाठपुरावा मोलाचा
रेल कामगार सेनेचे मंडल अध्यक्ष ललितकुमार मुथा, सचिव राजेश लखोटे, कार्याध्यक्ष प्रीतम टाक, सल्लागार प्रदीप भुसारे, विनोद वाघे, योगेश माळी, रामदास आवटे, कमलाकर बाणाईत, सुरेंद्र यादव, मंगेश शेलोडे, प्रकाश करसाले, राकेश पाठक, विजय तायडे, महेंद्र सोनवणे, विजय घेंघट, नरेश शर्मा, अरविंद थोरात, एम.के.शाह, गोपाळ बाबूराव पाटील, वीरकुमार मंमैय्या, पंकज ठाकरे, रमेश मराठे, सुरज सागर, संजय जगन्नाथ चौधरी यांच्यासह एनआरएमयु, एस.सी.एस.टी. असोसिएशन, ओबीसी असोसिएशन या संघटनाचे पदाधिकार्यांनी पालकमंत्र्यांना रस्ता कामासाठी साकडे घातले होते.