भुसावळ : शहरातील पीओएच कॉलनी भागातील 31 वर्षीय इसमाचा मुंबईतील केईएम रुग्णालयात स्वादूपिंडच्या आजाराने मृत्यू झाला. 28 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. सुरज बद्रीप्रसाद शर्मा (31, रा.रूम नंबर 1090, पीओएच कॉलनी, पंधरा बंगला, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी मुंबईच्या केईएम हॉस्पीटलचे वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर ती भुसावळ बाजारपेठ पोलिसात सोमवारी वर्ग करण्यात आला. शर्मा यांना स्वाधूपिंडाचा आजार झाल्यानंतर त्यांना उपचारार्थ मुंबई हलवण्यात आले मात्र 28 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता त्यांचा मृत्यू झाला. तपास एएसआय इरफान काझी करीत आहेत.