भुसावळातील ऑक्सीजन प्रकल्पाची टेस्टींग यशस्वी
महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते औपचारीक उद्घाटन : रुग्णांची होणार सोय
भुसावळ (गणेश वाघ) : भुसावळातील ट्रामा केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालय हॉस्पिटलच्या आवारात शंभर खाटांसाठी ऑक्सीजन प्रकल्पाची निर्मिती पूर्ण झाली असून प्रकल्पाचे यशस्वी टेस्टींग झाल्याने महाराष्ट्रदिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते त्याचे औपचारीक उद्घाटन होणार असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली.
ऑक्सीजन प्लॉण्टचे टेस्टींग यशस्वी
एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजन निर्मिती माजी पालकमंत्री आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून ऑक्सिजन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजनची या प्रकल्पातून निर्मिती होईल. हवेमधून ऑक्सिजन घेऊन हा थेट मशिनरीच्या माध्यमातून रुग्णांना मिळेल. या प्रकल्पामुळे आता बाहेरून ऑक्सिजन सिलिंडर घेण्याचा खर्चदेखील वाचणार आहे त्यामुळे शासनाच्या पैशांची बचतदेखील होणार आहे. नुकतीच मशनरी हॉस्पिटलच्या आवारात दाखल झाली तर आमदार सावकारे, डॉ.नि.तु.पाटील, वैद्यकीकय अधीक्षक डॉ.मयुर चौधरी, डॉ.चाकूरकर, अभियंता व कर्मचारी आदींच्या उपस्थितीत टेस्टींगही, कंत्राटदार अजीतसिंग बेहरा यशस्वी झाले.
ऑक्सीजन प्लॉण्टचे पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन
ऑक्सीजन प्लॉण्टचे औपचारीक उद्घाटन 1 मे महाराष्ट्र दिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अभीजीत राऊत, माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे आदींच्या उपस्थितीत होणार आहे.
प्लाँट सुरू झाल्याचे समाधान : आमदार
आमदार संजय सावकारे म्हणाले की, ग्रामीण रुग्णालयातील पहिलाच हा यशस्वी प्लँट असून आमदार निधीतून निधी देण्यासाठी पत्र दिले होते मात्र जिल्हा नियोजन निधीतून निधी घ्यावा लागला. प्लाँट कार्यरत झाल्याचे समाधान आहे. आज संपूर्ण देशात ऑक्सीजन कमतरता आहे त्या पार्श्वभूमीवर शहरात प्लाँट सुरू झाल्याचे समाधान आहे. काही अडचणी आल्या त्याचा बोध घेवून जिल्ह्यातील इतर प्लाँटसाठी तो मार्गदर्शक ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.