भुसावळातील ओम पार्कमध्ये बंद घरे फोडली

0
भुसावळ : शहरातील यावल रोडवरील ओम पार्कमध्ये चोरट्यांनी दोन बंद घरांना टार्गेट केले मात्र सुदैवाने घरात काहीही मूल्यवान वस्तू नसल्याने चोरट्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.
शनिवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास नागरिकांना जाग आल्याने त्यांनी दोन चोरट्यांना पळताना पाहिले. गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी बंद घरांना टार्गेट केले आहे. या भागात पोलिसांची गस्त अनियमित होत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे.