भुसावळ- सांस्कृतिक कला निकेतन व नुपूर कथ्थक डान्स अॅकेडमीच्या संयुक्त विद्यमाने कथ्थक नृत्य कार्यशाळेचे आयोजन रविवार, 1 व सोमवार, 2 जुलै रोजी ब्राह्मण संघात करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शिका म्हणून मुंबई येथील प्रसिद्ध नृत्यांगना वैष्णवी अग्निहोत्री व त्यांच्या कन्या व घाडगे आणि सुन या मालिकेतील अभिनेत्री रिचा आग्निहोत्री या लाभल्या होत्या. त्यांनी शिबिरार्थींकडून कथ्थक नृत्यातील अनेक विषय शिकवून करून घेतले. शिबिरात एकूण 45 विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला.
यांची होती उपस्थिती
उद्घाटन वैष्णवी अग्निहोत्री, रीचा अग्निहोत्री, विकास अग्निहोत्री, विनोद निगम, मुकेश खपली, रमाकांत भालेराव यांच्याहस्ते झाले. प्रास्ताविक मुकेश खपली व रमाकांत भालेराव यांनी केले. यावेळी विनोद निगम यांनी मार्गदर्शन केले. सुनील पाठक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सूत्रसंचालन शंभु गोडबोले यांनी केले. समारोप प्रसंगी विनय नेरकर उपस्थित होते. यशस्वितेसाठी सुनील पाटील, महेंन्द्र सैतवाल, शंभू गोडबोले, मधुकर गोडबोले, शुभम कुळकर्णी, प्रद्युम्न भालशंकर, देवेश गुरव, यश सोनवणे, सागर जोशी, निखील गाडेकर यांनी परीश्रम घेतले.