दहा वर्षांची परंपरा अबाधीत : सामाजिक कार्यात अग्रेसर मंडळ
भुसावळ- शहरातील जुना सातारा भागातील कुढापा गणेश मंडळाने यंदा श्री अष्टविनायकाचा देखावा तयार सादर करीत दहा वर्षांपासूनची देखाव्यांची परंपरा अबाधीत ठेवली आहे. या देखाव्याचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते तर लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक मनोज बियाणी, युवराज लोणारी, किरण कोलते या मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार, 17 रोजी सायंकाळी होणार आहे. या देखाव्यात साधूच्या भूमिकेत यश वाघुळदे व गणेश भक्ताच्या भूमिकेत प्रथमेष धांडे हे सहभागी होत आहेत. गेल्या 10 वर्षात एड्सविषयी जनजागृती, व्यसनमुक्ती, लोडशेडिंग, शेतकरी आत्महत्या, साक्षरता, महिला सबलीकरण अशा विषयांवर कुढापा गणेश मंडळ यांनी नेहमी सजीव देखावे सादर केलेले आहे व जनतेमध्ये जागृती निर्माण केलेली आहे. या कार्यक्रमास गणेशभक्तांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष दीपक धांडे यांनी केले आहे. देखावा यशस्वी होण्यासाठी सागर वाघोदे, नरेंद्र लोखंडे, किरण बढे, सागर लोखंडे, नितीन पाटील, रुपेश पाटील, घमा फेगडे, अनुप लोखंडे, कुंदन लोखंडे, पराग वाघोदे, सचिन पाटील, गणेश लोखंडे, सतीश धांडे, राकेश तुषार बजहाटे, प्रशांत धांडे, मुकेश महाले तसेच कुढापा मंडळाच्या कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.