भुसावळातील कुविख्यात इराणी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

0

महिलेच्या गळ्यातील धूम स्टाईल लांबवले मंगळसूत्र

भुसावळ- शहरातील इराणी मोहल्ल्यातील कुविख्यात दोघा इराणींच्या पुण्यातील बिबबेवाडी पोलिसांनी स्थानिक बाजारपेठ पोलिसांच्या मदतीने मुसक्या आवळल्या आहेत. महिलेच्या गळ्यातील धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवून आरोपींनी भुसावळात पलायन केले. अब्बास ईबादत अली इराणी (19, रा.पापा नगर, भुसावळ) व मोहम्मद अली कंबर अली इराणी (27, रा.भिवंडी, मुंबई) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

कुविख्यात आरोपींनी पुण्यातही केली चोरी
पोलिस दप्तरी चैन चोरीच्या बाबतीत कुविख्यात असलेल्या इराणी आरोपींनी पुण्यातील बिबवेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 6 मे रोजी दुपारी 1.54 वाजेच्या सुमारास वंदना बाळासाहेब पाटील (रा.पुणे) या महिलेच्या गळ्यातील 40 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र धूम स्टाईल लांबवून पोबारा केला होता. याबाबत पोलिस निरीक्षक पावसे यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसांना आरोपींचे वर्णन कळवल्यानंतर शहरातील पापा नगर भागातून शुक्रवारी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार, तालुक्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग, एएसआय तस्लिम पठाण, नाईक नरेंद्र चौधरी, दीपक जाधव, अश्विनी जोगी, विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, उमाकांत पाटील, संदेश निकम, ललित बारी आदींच्या पथकाने केली.