वर्षभरासाठी स्थानबद्ध ; नाशिक सेंट्रल जेलमध्ये रवानगी
भुसावळ : भुसावळातील कुविख्यात गुन्हेगार शेख तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम यास वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून रात्री उशिरा आरोपीस ताब्यात घेतल्यानंतर त्याची बाजारपेठ पोलिसांनी नाशिक सेंट्रल जेलमध्ये रवानगी केली. जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी एमपीडीए संदर्भात बुधवारी सायंकाळी आदेश पारीत केल्यानंतर सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, दीपक पाटील, प्रवीण ढाके, सुनील सोनवणे, युवराज नागरूत आदींच्या पथकाने आरोपीस ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्यास नाशिक हलवण्यात आले.