भुसावळ- जुन्या वादातून शहरातील पंचशील नगरातील 28 वर्षीय युवकाचा खून केल्यानंतर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रल्हाद होलाराम सचदेव (भुसावळ) हा पोलिसांना गुंगारा देत वरणगावमार्गे पसार झाला होता मात्र पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे संशयीत तळवेल येथे नातेवाईकांकडे आल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी दुपारी आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर डीबीचे विकास सातदिवे यांनी आरोपीच्या वरणगावच्या जंगलातून मुसक्या आवळल्या. तपास सहाय्यक निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक अनिस शेख, रवींद्र तायडे करीत आहेत.