यावल- तालुक्यातील बामणोद येथील 22 वर्षीय तरूणीवर भुसावळात आत्याचार प्रकरणी जीआरपी पोलिसांत गुन्हा दाखल असून बुधवारी जीआरपी पोलिसांचे पथक पिडीत तरूणीला घेवुन यावल बसस्थानकात आले होते. येथेदेखील सीसीटीव्ही पुटेजची गोपनीयरीत्या पाहणी करून फूटेज पोलिसांच्या पथकाने घेतले आहे. बामणोद येथील एका 22 वर्षीय तरूणीवर 8 ते 12 एप्रिल दरम्यान पाच जणांनी सामुहिक अत्याचार केल्याप्रकरणी भुसावळ रेल्वेत गुन्हा दाखल आहे तर या गुन्ह्याचे धागेदोरे यावल शहरातील बसस्थानकाशी जोडल्याचे पीडीतेच्या जवाबावरून समोर आले आहे.
यावल बसस्थानकात फूटेजची पाहणी
पीडीता 8 एप्रिल रोजी सायंकाळी यावल बसस्थानकावर होती असे तिने सांगितल्याने जीआरपी पोलिसांचे पथक पिडीत तरूणीला घेवुन बुधवारी सायंकाळी पाच वाजेला यावल बसस्थानकात आले होते व तेथे सुमारे दिड तास त्यांनी 8 एप्रिलच्या सीसीटीव्ही पुटेजची पाहणी केली त्यात त्यांना दुचाकीवर स्थानकात आलेल्या दोन तरूणांना पिडीताने ओळखले आहे व त्या दोघां तरूणांनीचं तिला दुचाकी वर बसवून नेल्याचे पिडीत सांगत होती तर तपासाच्या दृष्टीने काही सीसीटीव्ही पुटेज पोलिसांनी नेले आहे.