भुसावळातील गांजा प्रकरण : आरोपीला पोलिस कोठडीची हवा

भुसावळ : अप नवजीवन एक्स्प्रेसमधून भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरलेल्या ज्ञानेश्वर प्रकाश राठोड (21, नेरे रायगड, महाराष्ट्र) या प्रवाशाकडून सुमारे 33 हजार रुपये किंमतीचा गांजा रेल्वे सुरक्षा बलाने पकडला होता. आरोपीला अधिक कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्याविरोधात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी ज्ञानेश्वर राठोड यास भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

लोहमार्ग पोलिसांचे पथक ओरीसासह मुंबईत जाणार
संशयीत ज्ञानेश्वर राठोड हा मुंबईतील एमपीआयएल कंपनीत नोकरीला असून त्याने हा गांजा मित्र धोंडवा याने ब्रह्मपुर, बालिगुडा (ओरीसा) येथे दिल्याचे पोलिस चौकशीत कबुल केले आहे त्यामुळे लोहमार्ग पोलिस गांजा प्रकरणाच्या चौकशीसाठी आता ओरीसा व मुंबईत लवकरच जाणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. रेल्वेद्वारे गांजा वाहतुकीच्या दोन घटना दिड महिन्याच्या कालांतराने उघडकीस आल्यानंतर आता सुरक्षा यंत्रणांनी गाड्यांची कसून तपासणी करण्याची आवश्यक व्यक्त होत आहे. तपास लोहमार्गचे पोलिस उपनिरीक्षक संजय साळुंखे करीत आहेत.