भुसावळातील गावठी पिस्टल प्रकरण : अटकेतील तिघांना पोलिस कोठडी

भुसावळ : शहरातील वांजोळा रोड भागात संघटित टोळीतील तीन सदस्य गावठी पिस्तुलाच्या धाकावर दहशत निर्माण करीत असताना बाजारपेठ पोलिसांनी त्यांना अटक केली होती. संशयीतांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. वांजोळा रोड भागात काही संशयीत गावठी पिस्तूल बाळगून शस्त्र विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर सोमवारी रात्री 9 वाजता पोलिस पथकाने तुषार किशोर खरारे व कमलेश किशोर खरारे (दोन्ही रा.विघ्नहर्ता नगर, जामनेर रोड, भुसावळ) व विजय संजय निकम (चोरवड, ता.भुसावळ) यांना अटक केली होती. संशयीतांकडून गावठी पिस्तूल व दुचाकी जप्त करून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.