भुसावळ : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगाराला प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी एका वर्षांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशाल राजू टाक (रा.जामनेर रोड, वाल्मिक नगर, भुसावळ) असे हद्दपारीचे आदेश काढण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे.
अनेकांची लवकरच होणार हद्दपारी
बाजारपेठ पोलीस स्टेशनचे तत्कालीन निरीक्षक दिलीप भागवत यांनी 2019 मध्ये हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर प्रक्रिया होवून प्रांताधिकार्यांनी हद्दपारीचे आदेश काढले आहेत.