भुसावळातील गुन्हेगार वृतीच्या भिकार्यांना पोलिस उपअधीक्षकांची तंबी
कोरोना स्प्रेडच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानक परीसरातील भिकार्यांची कोरोना तपासणी
भुसावळ : शहरातील वाढत्या चोर्यांच्या अनुषंगाने संशयीतांवर नजर ठेवण्यासह रेल्वे स्थानक परीसरातील सर्वच भिकार्यांची सोमवारी पोलिसांनी चौकशी केली. लॉकडाऊन असल्याने त्यांना जेवणाचे पाकीटे देत 29 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. मूळ गावी जाण्याच्या सूचना भिकार्यांना प्रसंगी करण्यात आल्या गुन्हेगार वृतीच्या भिकार्यांना तंबी देत कुठेही हाणामार्या रस्त्यावर केल्यास त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाईचा इशारा पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिला.
भिकार्यांची पोलिसांकडे नोंद
भिकारी कोरोना पॉझीटीव्ह असल्यास कोरोना प्रेड होण्याची भीती होती. याच पार्श्वभुमीवर सोमवारी सायंकाळी पोलिसांकडून भुसावळ जंक्शन परिसरात तसेच शहरांमध्ये फिरणार्या भिक्षेकरी तसेच नशेच्या आहारी गेलेल्या सुमारे 70 व्यक्तींना रेल्वे स्टेशन परीसरामध्ये एकत्रीत करून त्यांची माहिती घेण्यात आली. यावेळी 70 पैकी 29 व्यक्तींची रॅपिड एंटीजन टेस्ट करण्यात आली. मात्र त्यात कोणीही पॉझीटीव्ह आढळले नाही. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी भिकार्यांना जेवणाची पाकिटे दिली. यावेळी सहा.पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, सहायक निरीक्षक हरीश भोये, जीआरपी निरीक्षक सुरज सरडे व कर्मचारी उपस्थित होते.