भुसावळातील गोळीबार प्रकरणी आरोपींना 1 पर्यंत पोलिस कोठडी

0

भुसावळ- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून वाद विकोपाला गेल्यानंतर समता नगरातील रहिवासी तथा पालिकेचे बांधकाम समिती सभापती व भाजपाचे नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबूराव खरात यांच्या घराबाहेर गोळीबार झाला होतर दोन गट भिडल्याने खरात यांच्या चारचाकीसह अन्य एकाच्या दुचाकीचे नुकसान होवून एक जण जखमी झाला होता. सोमवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या दंगलीनंतर शहर पोलिसांनी नगरसेवक रवींद्र खरात, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल उर्फ बाळा डिगंबर सोनवणे, नरेंद्र उर्फ बाळा अरुण मोरे, गिरीश देविदास तायडे, शुभम रमेश कांबळे या पाच संशयीतांना अटक केली होती. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

गावठी कट्ट्याचा शोध
शहर पोलिसांनी घटनास्थळावरून झाडलेल्या गोळीची एक पुंगळी जप्त केली होती तर प्रत्यक्षात या ठिकाणी तीन फैरी झाडण्यात आल्याचे बोलले जात आहे. शहर पोलिसांकडून या गुन्ह्यात वापरलेल्या गावठी कट्ट्याचा शोध घेतला जात आहे तर उर्वरीत आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक एन.बी.सूर्यवंशी करीत आहेत.