भुसावळातील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर सुरू करा
भाजपा नगरसेवक पिंटू कोठारी यांची प्रांताधिकार्यांकडे मागणी
भुसावळ : शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची सातत्याने रुग्ण संख्या वाढत असून कोरोनाचा फैलाव पाहता शहरातील ट्रामा केअर सेंटर (ग्रामीण रुग्णालय) तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहात कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे भाजपा नगरसेवक पिंटू (निर्मल) कोठारी यांनी गुरुवारी निवेदनाद्वारे केली. ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णांना ताटकळत थांबावे लागते त्यामुळे सोशल डिस्टन्स राखले जात नसल्याने कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती आहे. भुसावळातील रेल्वे रुग्णालयात पूर्वीप्रमाणे कोरोना रुग्णांवर उपचाराची सोय करावी, अशी अपेक्षाही निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली असून इन्सिडंट कमांडर या नात्याने व कोरोना नियंत्रणात येण्यासाठी यापूर्वीच्या वैद्यकीय कर्मचार्यांची नियुक्ती करावी, अशी अपेक्षाही निवेदनातून कोठारी यांनी व्यक्त केली आहे.