भुसावळातील ग्रीन पार्क भागातून एकाला तलवारीसह पकडले

भुसावळ : शहरातील ग्रीन पार्क भागातील नुरानी मशिदीच्या जवळ राहात असलेल्या अजीमोद्दीन लिसालुद्दीन शेख याच्या घरातून बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तलवार जप्त केली आहे. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार शरीफोद्दीन काझी, विजय नेरकर, सचिन पोळ, वैशाली सोनवणे, जीवन काकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहे.