भुसावळातील घाऊक भाजीपाला बाजारात पालिका बॅरीकेटींग करून लावणार हायमास्ट

0

एकच प्रवेशद्वार : सोशल डिस्टन्स ठेवून होणार लिलाव : प्रशासनाची करडी नजर

भुसावळ : शहरातील आरपीडी रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर (डी.एस.ग्राऊंड) पटांगणावर भाजीपाल्याचा घाऊक लिलाव होत असलातरी येथे होणारी मोठ्या प्रमाणावरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग फैलण्याची भीती असल्याने प्रशासनाने आता येथे बॅरीकेटींग लावून एकच प्रवेशद्वार ठेवण्याचा तसेच अधिक उजेडासाठी जास्तीचे हायमास्ट लावण्याचा निर्णय गुरूवारच्या बैठकीत घेतला. महसूल, पोलिस, नगर परीषद. भुसावळ, फळ भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष आणि सचिवांनी या विषयांसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर गुरुवारी दुपारी चार वाजता यासाठी बैठक घेतली.

यांची होती उपस्थिती
या बैठकीला प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, भुसावळ मुख्याधिकारी करुणा डहाळे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, भुसावळ फळ भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र चौधर , सचिव निलेश माळी उपस्थित होते.

व्यापार्‍यांची गैरसोय न होण्याची अपेक्षा
या चर्चात लिलावाच्या ठिकाणी बॅरीकेटींग करण्यात येणार असून प्रत्येक आडत दुकानदारामागे 25 व्यापार्‍यांना प्रवेश मिळेल. नगरपालिकेने अधिक पथदिव्यांची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली शिवाय येणार्‍या व्यापार्‍यांची गैरसोय होऊ नये, अशी मागणी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केली.