भुसावळ- हॉटेलमध्ये वाद झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी नाहाटा महाविद्यालयाच्या आवारात आलेल्या संशयीतांनी निलेश गोविंदा पवार (19, वैष्णवी नगर, भुसावळ) या तरुणाला मारहाण करीत त्याच्यावर चाकू हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी रात्री उशिरा सहा अल्पवयीन संशयीतांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. बुधवारी जळगाव बाल न्यायालयात त्यांना हजर केले असता त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, संशयीतांकडून चाकू हस्तगत करण्यात आला आहे.