भुसावळातील चार गुन्हेगारांसह एका टोळीची लवकरच होणार हद्दपारी

भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची माहिती

भुसावळ : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोहिम आखली आहे. संघटीत टोळ्यांसह गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांविरोधात यापूर्वी कारवाई झाल्यानंतर नव्याने पोलिस प्रशासनाने चार गुन्हेगारांसह एका टोळीच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला असून त्यावर लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे. अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असणार्‍या शहरातील तिघांच्या हद्दपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याकडे पाठवण्यात आले असून या प्रस्तावाची पोलिस प्रशासनाकडून चौकशी होऊन ते पुन्हा जिल्हा अधीक्षकांकडे पाठवण्यात येतील व यानंतर यावर निर्णय होणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली.

आणखी काहींच्या हद्दपारी प्रस्तावावर कामकाज
शहरातील अजून काही गुन्हेगारांच्या हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याची माहिती डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.