भुसावळातील चिमुकल्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

0

जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात गुणवंतांना पारीतोषिक वितरण

भुसावळ- शहरातील जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक पारीतोषिक वितरण समारंभात कला व क्रीडा स्पर्धेसह विविध उपक्रमात सहभागी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सोनू मांडे होते. व्यासपीठावर सचिव उषा पाटील, शालेय समिती सदस्य वसंत कोर्‍हाळकर, मुख्याध्यापिका अलका सुरवाडे उपस्थित होत्या. मुख्याध्यापिका अलका सुरवाडे यांनी अहवालाचे वाचन केले. अंजली ठाकूर, सुमेध वानखेडे, मनीषा राजपूत, अश्‍विनी कुलकर्णी यांनी यादीचे वाचन केले. सूत्रसंचालन संध्या चौधरी तर आभार स्मिता जोशी यांनी मानले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी यशस्वीतेसाठी परीश्रम घेतले.