भुसावळातील चेतन खडसे स्थानबद्ध

भुसावळ प्रतिनिधी दि 4 – शहरातील बाजारपेठेत पोलीस स्टेशन मधील एम.पी.डी.एम. प्रस्तावातील इसम नामे चेतन उर्फे गुल्ला पोपट खडसे (वय २९) राहणार हनुमान नगर भुसावळ यांचे विरुध्द मा. जिल्ह्याधिकारी जळगांव यांचे कडेस पाठवलेल्या प्रस्तावाप्रमाणे जिल्ह्या दंडाधिकारी याचे कार्यालय (ता. २९) ऑगेस्ट अन्वये चेतन उर्फे गुल्ला पोपट खडसे यास एक वर्षा करीता स्थानबद्ध करून मध्यवर्ती कारागृह, साने गुरुजी नगर, आदर्श नगर, मुंबई येथे पाठविण्याकरिता ताब्यात घेण्यात येऊन (ता. ३) सप्टेंबर रोजी १२.३३ वाजता ताब्यात घेतलेबाबत समजपत्र त्यास व त्यांच्या पत्नी यांना देण्यात आले. मुंबई येथे दाखल करणेकामी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोउनिरी. मंगेश बेंडकोळी, पोकॉ. परेश बिऱ्हाडे, मंदार महाजन, हर्षल महाजन अशांना योग्य त्या सूचना देऊन जाप्तानिशी चालक नामे सुनील सोनवणे सह पाठविण्यात आले आहे.

 

सदरील कारवाई पोलीस अधिक्षक एम. राजकुमार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपविभागीय अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोउनिरी मंगेश जाधव, पोहेकॉ सुनील जोशी, पोकॉ प्रशांत परदेशी अशांनी मिळून केली