47 उपद्रवींना पाच दिवसांसाठी शहर बंदी : प्रांताधिकार्यांचे आदेश
भुसावळ- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व सामाजिक शांततेला धोका ठरू पाहणार्या चार गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले तर शहर हद्दीतील 15, बाजारपेठ हद्दीतील 21, तालुका हद्दीतील दोन तसेच वरणगावातील नऊ उपद्रवी मिळून 47 उपद्रवींना श्री विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर 19 ते 24 सप्टेंबरदरम्यान शहरात बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश बुधवारी प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी जाहीर करताच गुन्हेगारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. पोलिस प्रशासनाने आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरुवातही केली आहे.
यांच्यावर झाली हद्दपारीची कारवाई
बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (पंढरीनाथ नगर), अजय गिरधारी गोडाले (पंधरा बंगला, लाल मंदिराजवळ) व शेख चांद शेख हमीद (दीनदयाल नगर), मुकेश प्रकाश भालेराव (टेक्नीकल हायस्कूलजवळ) यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव निरीक्षक देविदास पवार यांनी पाठवले होते तर या प्रस्तावांच्या छाननीअंती तिघांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.
47 उपद्रवींना उत्सव काळात शहरबंदी
बाजारपेठ हद्दीतील अजय प्रताप न्हावकर (तुलसीनगर, भुसावळ), योगेश देविदास तायडे (महेश नगर), कुणाल वामन इंगळे (पंचशील नगर), अमोल काशीनाथ राणे (श्रीराम नगर), राजेश उर्फ गोलु सुभाष सावकारे (न्यू एरीया), चॅम्पियन श्याम इंगळे (पंचशील नगर), जयेश दत्तात्रय चौधरी (दीनदयाल नगर), राजेंद्र किसन गोंडाले (वाल्मीक नगर), रवींद्र उर्फ दादू रमेश चौधरी (दीनदयाल नगर), नकूल ठाणसिंग राजपूत (श्रीराम नगर), श्रावण रमेश देवरे (रमाबाई आंबेडकर नगर), शेख कलीम शेख सलिम (दीनदयाल नगर), शम्मी प्रसाद चावरीया (वाल्मीक नगर), हिरामण उर्फ गोजोर्या सखरू जाधव (वाल्मीक नगर), निखील सुरेश राजपूत (दत्त नगर), समीर उर्फ धोनी कृष्णधनकर (पंधरा बंगला), अक्षय रतन सोनवणे (मच्छीमार्केट), जितेंद्र उर्फ मोनू रामदास कोल्हे (अमरनाथ नगर), चेतन प्रकाश सुरवाडे (व्हीआयपी कॉलनी), अरबाज हैदर मलिक (जाम मोहल्ला), अशोक सदाशीव कोळी (दीनयाल नगर), तालुका हद्दीतील शिवा दिलीप वाघ (निंभोरा), गोरख उर्फ दिलीप मोतीराम वाघ (निंभोरा) तसेच शहर पोलिस ठाणे हद्दीतील ओमप्रकाश रामगरीब चापरे (हद्दीवाली चाळ), नवीन सुरेश लोखंडे (सम्राट अशोक नगर, कंडारी) प्रकाश यशवंत माळी (अकबर टॉकीज), सौरभ यशवंत कुटे (सुपे गल्ली), जयंत मोहन लोणारी (महात्मा फुले नगर), सुरेश आनंदा चंडाले (शांती नगर), नवीन उर्फ गल्लू कैलास पाठक (द्वारकानगर), विक्की विलास राजपूत (जुनी गमाडिया प्रेस), यशवंत दगडू जाधव (बारा बंगला), जितेंद्र सुकदेव भालेराव (महात्मा फुले नगर), सैय्यद आजीम सै.मुजफ्फर (रेल्वे नॉर्थ कॉलनी), गणेश नारायण तल्लारे (अशोक नगर), रणजीत मोहन सावंत (मच्छिमार्केट), राजू बना सपकाळे (न्यू पोर्टर चाळ), सतीश धुलिया कच्छवे (महात्मा फुले नगर) व वरणगावातील जितेंद्र दशरथ मराठे (सिद्धेश्वर नगर), सोनू संजय चौधरी, निलेश एकनाथ काळे, जितेंद्र एकनाथ काळे, सागर उर्फ गोलू एकनाथ गुमरकर (रामपेठ), अ.हमीद अ.मजीद, जमीर खान नईम खान, जहीर खान उर्फ लारा अख्तर खान, साजीदखान जाफरखान यांना उत्सव काळात 19 ते 24 दरम्यान शहरात येण्यास बंदी करण्यात आली आहे. प्रांताधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघण झाल्यास दोषींवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा ईशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.