भुसावळातील जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

भुसावळ : कुर्‍हे-वराडसीम गटातील जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांना जिल्हा परीषद पंचायत समिती असोसिएशन महाराष्ट्रतर्फे कर्तव्यदक्ष राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सावकारे यांची नाशिक विभागातून एकमेव महिला सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या 5 मार्च रोजी अण्णाभाऊ सभागृह एअरपोर्ट रोड येरवडा, पुणे येथे होईल.

पुरस्कारानंतर अभिनंदनाचा वर्षाव
दरम्यान, पुरस्कारार्थी निवड समितीमध्ये जिल्हा परीषद पंचायत समिती असोचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष शरद बुट्टे-पाटील, राज्य सरचिटणीस सुभाष घरत, प्रदेश कार्याध्यक्ष उदय बने, राज्य उपाध्यक्ष जयमंगल जाधव यांचा समावेश आहे. जिलह परीषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांना राज्यस्तरीय कर्तव्यदक्ष जि.प.सदस्य पुरस्कार जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, जिल्हा परीषदेच्या सभागृहात ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यात आली व प्रश्न मार्गी लावण्यात आले तसेच उत्कृष्ट काम केल्याने जि.प.सदस्य सावकारे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्या भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांच्या सौभाग्यवती आहेत.