भुसावळातील जुना सातारा खळवाडी भागातून दुचाकी लांबवली !

भुसावळ प्रतिनिधी दि 17 भुसावळ शहरातील जुना सातारा, खळवाडी भागातून चोरट्यांनी ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सतीश प्रभाकर भोळे (५२) हे नोकरदार असून त्यांच्या मालकिची ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.१९ ई.डी. ७४१४) घराबाहेर लावली असताना गुरुवार, 15 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लांबवली. दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर भोळे यांनी शहर पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली.