भुसावळ- चटई घेऊन जाणार्या ट्रकवर समोरून येणारा कंटेनर धडकून झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील यावल रस्त्यावर गुरुवारी रात्री सव्वा नव्वा वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. दरम्यान, अपघातप्रकरणी रात्री उशिरा अज्ञात कंटनेर चालकाविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर या अपघाताील आरोपी असलेला कंटेनर चालकाचा हात मोडल्याने त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे समजते.
दोन तास वाहतूक झाली ठप्प
समजलेल्या माहितीनुसार, चटई घेऊन जाणारा ट्रक (एम.पी.09 के.डी.2601) भुसावळकडून रावेरकडे जात असताना यावलकडून भुसावळकडे भरगाव वेगाने येणारा कंटेनर (एन.एल.01 एल 8206) ने समोरून धडक दिल्याने ट्रक चालक राजेश महेश पाल (45, बागपत, ता.वडवा, मध्यप्रदेश) हा जागीच ठार झाला होता. अपघातानंतर कंटेनर चालक पसार झाल्याने व रस्त्यावरील अपघातामुळे तब्बल दोन तास दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. अपघाताचे वृत्त कळताच शहर पोलिस ठाण्याचे शंकर पाटील, साहिल तडवी, मो.वली सैय्यद, विजय पाटील, भूषण चोधरी, जितेंद्र सोनवणे, संजय पाटील, अनिल चौधरी आदींनी वाहतूक सुरळीत केलीे.
कॅबिन तोडून काढला मृतदेह
कंटनेरच्या समोरून धडकेमुळे ट्रक चालक गंभीर जखमी झाला तर ट्रॅक्टर लावून ट्रकची कॅबीन ओढून ट्रक चालकाला बाहेर काढण्यात आले मात्र उपचाराला हलवण्यापूर्वीच ट्रक चालकाचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणी कंटेनर चालक (नाव, गाव माहित नाही) ट्रक क्लीनर रोहित कडवानी सावळे (बागवत, ता.वडवा) यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, कंटेनर चालकही या अपघातात जखमी झाला असून त्याचा हात फॅ्रक्चर झाल्याचे सूत्रांनी सांगितले. तपास हवालदार मो.वली सैय्यद करीत आहेत.