भुसावळातील तत्कालीन सत्ताधार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांची चपराक

0

2010 काळातील ठराव क्रमांक 21 केला रद्द ; ‘त्या‘ संकुलासह गाळ्यांचा पालिका घेणार ताबा

भुसावळ: तत्कालीन नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांच्या 2010 या कार्यकाळात केलेले अनेक ठराव जिल्हाधिकार्‍यांनी रद्द ठरवले आहे. हा निर्णय तत्कालीन सत्ताधार्‍यांना हादरा देणारा ठरला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे 15 डिसेंबर 2010 रोजी ठराव रद्द करण्यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी 15 नोव्हेंबर रोजी 15 डिसेंबर 2010 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक 21 रद्द केला आहे.